‘आयास’ : खडतर, संघर्षशील जीवनप्रवासाचा प्रेरणादायी आविष्कार
माणूस जीवनाची नेमकी दिशा पकडून स्वार्थापेक्षा सत्य महत्त्वाचे मानतो, तेव्हा संघर्षमय, अभावग्रस्त जीवनप्रवासाचा मार्ग उत्थानाच्या दिशेने सरकत जातो. कलाकृतीतून अशा स्वरूपाचे जीवनभाष्य करण्यासाठी लेखकाला समाजजीवनाच्या अंतरंगात उतरावे लागते. ती खोली या कादंबरीत दिसते. शेवटी संग्राम शेतकरी आंदोलन, आरळी बंधारा आंदोलनात सहभागी होतो. शेतकऱ्याच्या कष्टाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे ही त्याची अपेक्षा असते.......